रजा अकादमी, पीएफआयचे काय?

मुंबई : काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यावरुन आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता आहे. मात्र, हिंदूंना राज्यात रजा अकादमी आणि पीएफआय सारख्या संघटनांकडून नेहमीच लक्ष केले जाते त्याचे काय?, अशी टीका राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, हिंदूंना राज्यात रजा अकादमी आणि पीएफआय सारख्या संघटनांकडून नेहमीच लक्ष केले जाते त्याचे काय? काश्मीर पंतप्रधान मोदींच्या हातात सुरक्षित आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका, असा खोचक टोला राणेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1533269272738557954

त्यामुळे नितेश राणेंच्या ट्विटनंतर पुन्हा काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून 'कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग' काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यानी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई