उद्धव ठाकरे, श्रीजी होम कंपनी कोणाची ? किरीट सोमैय्या यांचा सवाल

नाशिक (हिं.स) मुंबईच्या शिवाजी पार्क समोर उभी असलेली रिकामी इमारत आहे ती श्रीजी होम इमारत कोणाची आहे? श्रीजी होम्स कंपनी अजूनही रजिस्टर झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे साले श्रीधर पाटणकर, राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी होम्स ही बनवली. ईडी आणि संबंधित शासकीय यंत्रणाकडे सगळे कागदपत्र दिले आहेत. त्यामूळे यातील सत्य लवकरच बाहेर येईल, अन् दोषिना सजा होईल असे भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.


नाशिक दौऱ्यावर आलेल्या सोमैय्या यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयांत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष गिरिश पालवे, आ. राहूल ढिकले, आ. सीमा हिरे, बाळा साहेब सानप, केदा आहेर, विजय साने, दिनकर पाटील, सुरेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


सोमैय्या म्हणाले की, सचिन वाझे, बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षिदार झाले आहेत. वाझेच्या वसुली मधून हॉटेल कॉन्टॅक्टर चे पैसे दिले अस जर वाझेनीच सांगितले तर ''तेरा क्या होगा कालिया'' असा टोला त्यांनी परब यांना लगावला. वाझेनी जर सांगितले की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तर सत्य बाहेर येईन. त्यामुळे उध्दव ठाकरे, अनिल परब यांच्यावर कारवाई अटळ आहे. बेईमान कोण सेनेचे आमदार, त्यांना समर्थन देणारे आमदार की नेते बेईमान हा खरा प्रश्न आहे.


राज्य शासनाच्या भ्रष्टाचारावर चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू झाला आहे. सरकारी यंत्रणा शासनाच्या तांब्यात आहेत त्यामुळे बाजार मंडणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी सोमैय्या यांनी केली.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.