Monday, July 1, 2024
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरे, श्रीजी होम कंपनी कोणाची ? किरीट सोमैय्या यांचा सवाल

उद्धव ठाकरे, श्रीजी होम कंपनी कोणाची ? किरीट सोमैय्या यांचा सवाल

नाशिक (हिं.स) मुंबईच्या शिवाजी पार्क समोर उभी असलेली रिकामी इमारत आहे ती श्रीजी होम इमारत कोणाची आहे? श्रीजी होम्स कंपनी अजूनही रजिस्टर झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे साले श्रीधर पाटणकर, राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी होम्स ही बनवली. ईडी आणि संबंधित शासकीय यंत्रणाकडे सगळे कागदपत्र दिले आहेत. त्यामूळे यातील सत्य लवकरच बाहेर येईल, अन् दोषिना सजा होईल असे भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या सोमैय्या यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयांत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष गिरिश पालवे, आ. राहूल ढिकले, आ. सीमा हिरे, बाळा साहेब सानप, केदा आहेर, विजय साने, दिनकर पाटील, सुरेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सोमैय्या म्हणाले की, सचिन वाझे, बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षिदार झाले आहेत. वाझेच्या वसुली मधून हॉटेल कॉन्टॅक्टर चे पैसे दिले अस जर वाझेनीच सांगितले तर ”तेरा क्या होगा कालिया” असा टोला त्यांनी परब यांना लगावला. वाझेनी जर सांगितले की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तर सत्य बाहेर येईन. त्यामुळे उध्दव ठाकरे, अनिल परब यांच्यावर कारवाई अटळ आहे. बेईमान कोण सेनेचे आमदार, त्यांना समर्थन देणारे आमदार की नेते बेईमान हा खरा प्रश्न आहे.

राज्य शासनाच्या भ्रष्टाचारावर चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू झाला आहे. सरकारी यंत्रणा शासनाच्या तांब्यात आहेत त्यामुळे बाजार मंडणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी सोमैय्या यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -