Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीसांगलीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

सांगलीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

सांगली (हिं.स.) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील कासेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातातील मृत जयसिंगपूर येथील आहेत. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही कार पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

मिळालेल्या माहि तीनुसार, हा अपघात शनिवारी घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हे कुटुंब कारमधून पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. कराड तालुक्यातून पुढे काही अंतरावरच्या कासेगावजवळ हा अपघात झाला. येवलेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कंटेनरला पाठीमागून एमएच १४ डीएन ६३३९ हा क्रमांक असलेली कार जोरात धडकली. या अपघातात अरिंजय अण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरू अभिनंदन शिरोटे यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.

याबाबत कासेगाव पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच ०५ एएम ३६४४) थांबलेला होता. यावेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कारने (एमएच १४ डीएन ६३३९) उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -