मृणालिनी कुलकर्णी
अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाले. दुष्काळ, अन्नटंचाई, वाढते तापमान हे सारे पर्यावरणीय प्रश्न आपणा प्रत्येकाशी निगडित आहेत. सजीव आणि निर्जीव यांच्या घटकांमधील आंतरक्रियांमधून पर्यावरण बनते. पर्यावरण हा निसर्गाचा एक भाग आहे. मानवाने निसर्गात हस्तक्षेप केल्याने आज धोक्यात आलेल्या पर्यावरणीय परिस्थितीत आपण राहत आहोत. झपाट्याने होणाऱ्या शहरी विकासात, समुद्र हटवतो, डोंगर फोडतो, जंगल तोडतो, सोबत ई-कचरा, यातून १. हवामान बदल २. निसर्गाची (जैवविविधता)ची हानी ३. प्रदूषण या तीन महत्त्वाच्या समस्या जगापुढे उभ्या आहेत. आपले अस्तित्व सुरक्षित राहण्यासाठी पर्यावरणीय समतोल सुरक्षित हवा.
पर्यावरणीय समस्या समजून घेण्यासाठी, त्यावर प्रकाश टाकण्यासाठी प्रथम १९६८ ला पर्यावरणावर लक्ष केंद्रित केले गेले. संयुक्त राष्ट्राने १०७२ पासून ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. दर वर्षीच्या थीमनुसार पर्यावरण संरक्षणासाठी, जागरूकता आणि कृती करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली जाते.
आज ५ जून २०२२ च्या जागतिक पर्यावरणाचे यजमानपद स्वीडनकडे आहे. या वर्षीची ओळख “फक्त एक पृथ्वी” या
थीमद्वारे एक साधा संदेश दिला जात आहे. ‘सजीवांसाठी अनुकूल पर्यावरणीय परिस्थिती असलेला पृथ्वी हा एकमेव ज्ञात ग्रह आहे, तेच आपले घर आहे.’ साऱ्यांनी एकत्र येऊन तिची काळजी घ्या, तिचा सांभाळ करा, आदर राखा.
‘आमची जबाबदारी, आमची संधी’ म्हणत स्वीडनने उत्साहपूर्वक सामूहिक कृतीद्वारे पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी जगातील देशांना आमंत्रित केले आहे. स्टॉकहोम +५० स्वीडन, ‘फक्त एक पृथ्वी’ या थीममधून निसर्गाशी सुसंगतपणे जगण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. बरोबर ५० वर्षांपूर्वी, १९७२ च्या स्टॉकहोम परिषदेसाठी ‘केवळ एक पृथ्वी’ हीच थीम होती. ५० वर्षांनंतरही ‘पृथ्वी हा एकमेव ग्रह आपले घर आहे’ हे सत्य टिकून आहे.
आजपर्यंत आपणच आपल्या कृतीने स्वतःला असुरक्षित बनवत होतो. पृथ्वी नसेल, तर राहणार कुठे? आणि खाणार काय? पृथ्वीचा ७०% पाण्याने व्यापलेला महासागर प्लास्टिकने गुदमरत आहे, दुसरा महत्त्वाचा घटक शुद्ध हवा (?). निसर्ग ही एक अदृश्य शक्ती असून तिचे मूल्य समजून घ्या. निसर्गाशी एकरूप व्हा.
निसर्गाच्या संरक्षणासाठी, पृथ्वीचे संरक्षण करणारे ओझोनचे छिद्र, हरितगृह वायूचे उत्सर्जन, यासाठी हिरवे आच्छादन वाढवावे लागेल. इको फ्रेंडली किंवा पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तू वापराव्यात. पृथ्वी दिन साजरा करण्यामागचा उद्देश प्राणी / पक्षी / झाडे निम्म्याहून अधिक नामशेष झाल्या आहेत. याउलट जगात लोकसंख्या दुपटीने वाढत आहे.
पृथ्वी हिरवीगार करण्याची जबाबदारी करिअर म्हणूनही स्वीकारू शकतात. हरियाली ही संस्था गेली २५ वर्षे वनीकरणाने, जंगल निर्माण करून पृथ्वी हिरवीगार करीत आहे. अभिनेते सयाजी शिंदेप्रमाणे अनेकजण व्यक्तिगत पातळीवर हजारोंनी झाडे लावीत आहेत. यातून परिसंस्था, अन्नसाखळी, पशुपक्ष्यांचे अधिवास हे सारे विकसित होईल. तंत्रज्ञानाने अर्थपूर्ण पिके काढा, मातीची धूप रोखण्याचा प्रयत्न करावा. अलीकडे शालीऐवजी भेट म्हणून छोटे रोपटे देतात, हेही स्वागतार्ह आहे. देवराई/देवतळेप्रमाणे सरोवराचे, वन्यजीवांचेही महत्त्व ओळखा. पृथ्वीवर गुंतवणूक करा.
महर्षी दयानंद कॉलेजमधील जीवशात्रीय समविचारी युवकांनी ‘इको एको’ स्वयंसेवी संस्था काढून लोकांमध्ये जनजागृतीचे काम करतात. त्यांचे प्रश्न सोडवितात. संशोधन करतानाच वन विभागाशी संपर्कात राहून त्याचीही कामे विनामूल्य करतात.
दिल्लीची विज्ञान पर्यावरण संस्था, कमी कार्बन निर्माण करणाऱ्या सर्वसमावेशक विकासाला उत्तेजन देतात. हरित संपत्ती, स्वच्छ पाणी, घराच्या / इमारतीच्या छतावर सोलर हिटरचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘मंदिरापेक्षा प्रसाधनगृहे महत्त्वाची’, हे पंतप्रधान मोदीजींचे विधान सत्यात उतरत आहे. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी यंत्रणा सर्वत्र उभी राहावी. विमानतळावर कार्बन मॅपिंग आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणात कृत्रिम उपग्रहाद्वारे पृथ्वीचे निरीक्षण आणि हवामानावर अभ्यास केला जातो. तत्सम छायाचित्रे क्षणार्धात जगभर पाठविली जातात. त्यात भारताचेही उपग्रह सक्रिय आहेत. डब्लूडब्लूएफ या संघटनेकडून आजही दर वर्षी ‘अर्थ अवर’ म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक तास अनावश्यक वीज बंद केली जाते.
‘पर्यावरण जागवा आणि पृथ्वी वाचावा’! पर्यावरण विज्ञान हा एक दुर्लक्षित राहिलेला अभ्यास घटक. पर्यावरण अभ्यासाचे उद्दिष्ट आज स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचे ठरत आहे. पर्यावरणविषयी आपण वाचतो, पाहतो नि सोडून देतो. परिसंवाद / चर्चा संमेलन त्याचे पुढे काय होते? या कामात नियमितता हवी. परिवर्तनासाठी सामुदायिक कृतीच हवी. आज सर्वत्र पर्यावरणाविषयी कमालीची उदासिनता आणि बेफिकीर वृत्ती दिसून येते.
मी काय करू शकते? ग्रेटा थनबर्ग : एस्पर्जर (aspergers) सिन्ड्रोम असलेली, एक सर्वसामान्य १५ वर्षांची किशोरवयीन मुलगी. तिला लहान वयातच हवामानाचे महत्त्व समजले. हवामानाच्या निष्क्रियतेच्या विरोधात, संथप्रगतीमुळे, त्वरित कारवाई व्हावी म्हणून शाळेत न जाता संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेच्या संसदेसमोर एकटी तळ ठोकून बसली. नंतर इतर लोक जमा झाले. २०१९ सप्टेंबरमध्ये सर्वात मोठ्या हवामान प्रदर्शनात संपात सर्वांना सामील होण्यासाठी प्रेरित केले. २०१९च्या टाइम मासिकाची ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवडून आली. आज जगासमोर ‘हवामान प्रचारक’ चेहरा म्हणून ओळखला जातो. ती म्हणते, ‘माझ्याकडे उदास व्हायला वेळ नव्हता.’
पर्यावरण हा पदवी/पदव्युत्तर/इंजिनीअर असा अभ्यासक्रम आहे. त्यात विज्ञान आहे. शालेय स्तरावर हा विषय वाचून सोडून देण्याऐवजी समजून स्वतःत परिवर्तन घडवा. भविष्यात निदान ऊर्जा बचत, बाहेर कचरा न टाकणे, स्वतःचे वाहन वेळोवेळी साफ करणे, प्लास्टिकचा कमी वापर हे सहज शक्य आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाची छोटी कृतीही “फक्त एक पृथ्वी”साठी महत्त्वाची ठरते. पृथ्वीचे हरवलेले सौंदर्य ती परत फुलविते.