Monday, September 15, 2025

नूपूर शर्मा सहा वर्षांसाठी निलंबित

नूपूर शर्मा सहा वर्षांसाठी निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांचं प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपू्र्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केले होते. त्या वक्तव्यामुळे भाजपने नूपूर शर्माचे प्राथमिक सदस्यत्त्व रद्द केले आहे.

तर, नवीन जिंदाल यांचेही प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर विविध संघटनांनी संताप व्यक्त केला होता. रझा अकादमी आणि एमआयएमने नूपूर शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या, असा आरोप रझा अकादमीने केला होता.

नूपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भातील वक्तव्यानंत सुरु झालेल्या वादाला शांत करण्यासाठी भाजपकडून एक पत्रक जारी करुन आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. कोणत्याही धर्मातील महामानवासंदर्भातील अपमानास्पद वक्तव्य स्वीकारली जाणार नाहीत, असं भाजपकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा