Monday, March 17, 2025
Homeमहत्वाची बातमी‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या माहितीपटाला मिफ्फचा पुरस्कार

‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या माहितीपटाला मिफ्फचा पुरस्कार

सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा दिमाखदार समारोप

  • केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते मिफ्फ पुरस्कारांचे वितरण
  • पोलंडचा ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ ठरला यंदाच्या मिफ्फचा सर्वोत्तम अॅनिमेशनपट

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत २९ मे ते ४ जून २०२२ या कालावधीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिफ्फ २०२२ अर्थात १७व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दिमाखदार सोहोळ्याने समारोप करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, पत्रसूचना कार्यालय पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि मिफ्फ महोत्सव संचालक आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

दुसऱ्या महायुद्धाचे युद्धकैदी असलेल्या पित्याच्या शोधार्थ जाणाऱ्या निश्चयी मुलीची कथा अत्यंत परिणामकारकपणे मांडणाऱ्या ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या नेदरलँड्सच्या माहितीपटाला, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्णशंख पुरस्कार मिळाला आहे. डच दिग्दर्शिका, अॅलिओना व्हॅन डर होर्स्त यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केलं असून, इल्जा रोमन्स यांनी निर्मिती केली आहे. अत्यंत संवेदनशील हाताळणी आणि उत्तम पद्धतीमुळे, हा सिनेमा सर्वोत्तम ठरला आहे. सुवर्णशंख, १० लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार, (४५ मिनिटांपर्यंत) रौप्य शंख, भरतातील ‘साक्षात्कारम’ या मल्याळी आणि आणि फारो बेटांवरील ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटांना विभागून मिळाला आहे. सुदेश बालन यांनी ‘साक्षात्कारम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुंबई आयआयटीने त्याची निर्मिती केली आहे. ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटाचं दिग्दर्शन गुडमुंड हेल्सम्सडल यांनी केलं असून निर्मिती गुडमुंड हेल्सम्सडल, सोलवा स्वार्ताफोस यांची आहे. रौप्य शंख, अडीच लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख पुरस्कार पोलंडच्या ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ या अॅनिमेशनपटाला मिळाला आहेरौप्य शंख, पाच लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्याशिवाय ज्यूरी विशेष उल्लेखनीय चित्रपटाचे प्रशस्तीपत्र पुरस्कार, भारतातील ‘घर का पता’, आणि ‘लॅपचेस आर व्हानिशिंग’ या लघुपटांना मिळाला आहे.

‘घर का पता’चे दिग्दर्शन मधूलिका जलाली यांनी केले असून, निर्मिती नवनीत कक्कर यांची आहे, तर ‘लॅपचेस आर व्हानिशिंग’चे दिग्दर्शन अभ्युदय खेतान यांनी केले असून निर्मिती फिल्म्स डिव्हिजनची आहे. मीना रॅड (फ्रान्स), एस. नल्लमुथू (भारत), अनंत विजय (भारत), जॉन पिएर सेरा (फ्रान्स) आणि डॅन वॉलमन (इस्राएल) या मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागासाठी परीक्षक म्हणून काम पहिले.

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा सर्वोत्कृष्ट पदार्पण-दिग्दर्शनाचा पुरस्कार, भारतातील ‘राधा’ या अॅनिमेशन पटाचे दिग्दर्शक, बिमल पोद्दार यांना मिळाला आहे. एक लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -