Tuesday, April 22, 2025
Homeमहामुंबई‘माझ्यावर असेच आपले प्रेम राहू द्या’

‘माझ्यावर असेच आपले प्रेम राहू द्या’

अशोक सराफांकडून कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त

वैजंयती आपटे

मुंबई : असे भाग्य फार कमी लोकांना मिळते आणि आज ते मला लाभले आहे. असा सत्कार सोहळा कुणाचा झाला असेल असे वाटत नाही. मला आभार मानायचे आहेत ते रसिकांचे. कारण तुम्ही नसते, तर मी नसतो. आजच्या माझ्या नाटकाच्या प्रयोगात नाट्यगृहात एकही खुर्ची रिकामी नाही आणि हे मी कधीच विसरू शकणार नाही. माझे सहकलाकार, माझे सगळे तंत्रज्ञ, निर्माते, जोपर्यंत माझ्या पाटीशी उभे आहेत, तोपर्यंत मी कुणालाही भीत नाही. माझ्यावर असेच प्रेम राहू द्या, अशा हृद्य भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.

सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ ह्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अष्टविनायक या संस्थेतर्फ आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकाच्या प्रयोगात प्रेक्षकांना हार अर्पण करून अशोकमामा यांनी रसिकांचे आभार मानले. शनिवारी शिवाजी मंदिर येथे या नाटकाचा विनामूल्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या वेळी अशोक सराफ यांना ७५ दिव्यांनी ओवाळून औक्षण करण्यात आले. तसेच प्रेक्षकांच्या साक्षीने केक कापण्यात आला. अशोक सराफ यांचा ७५वा वाढदिवस तसेच त्यांच्या नाट्य-चित्रपट कारकिर्दीला ५० वर्षे झाली आहेत.

यावेळी बोलताना पत्नी निवेदिता सराफ यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. मुलगा अनिकेत, बंधू सुभाष सराफ, चिन्मय मांडलेकर, निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर, निर्मिती सावंत, अशोक मूल्ये, शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा सावंत, हरी पाटणकर इत्यादी मंडळी उपस्थित होती. शिवाजी मंदिरतर्फेही अशोकमामांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -