Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

पराभवाच्या भीतीनेच घोडेबाजाराची वक्तव्य; प्रवीण दरेकर यांची शिवसेनेवर टीका

नाशिक (हिं.स) : शिवसेना नेत्यांच्या आमदाराला घोडेबाजारात उभे करण्याच्या वक्तव्याचा निषेध आहे. पराभूत झाल्यानंतर घोडेबाजारामुळे पराभव झाला. त्यामुळे शिवसेना नेत्यांना आता तरी सुबुद्धी यावी, आमदाराला अवमानित करू नये. घोडे बाजार कुठे होतो ते शोधा. घोडे बाजार होत असेल तर सरकार तुमचे आहे हा तपास करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

नाशिक दौऱ्यावर आले असता दरेकर यांनी शासकिय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष गिरिश पालवे, आ. राहुल ढिकले, आ.सीमा हिरे, बाळासाहेब सानप, आदी उपस्थित होते. ते म्हणाले की, एक आमदार ३ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतो. त्यामुळे एका आमदाराचा अपमान हा ३ लाख लोकांचा अपमान आहे. आम्ही राज्य सरकारचे वसुली सरकार नाव ठेवले आहे कारण सरकारचे अधिकारी वसुली करत आहेत.

त्यामुळेच महागाई वाढत आहेत पंतप्रधान मोदी शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी विविध योजना आनल्यात. परंतु राज्य शासन बळीराजा प्रती असवेदनशिल आहे. आता तरी शेत कर्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष कार्य करा असे आवाहन दरेकर यांनी केले.

Comments
Add Comment