Wednesday, December 24, 2025

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, सात दिवस क्वारंटाईन

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, सात दिवस क्वारंटाईन

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी त्वरीत आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच सर्वांनी स्वत: ची काळजी घ्यावी असेही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1533340392157982725

कोरोना झाल्यानंतर साधारण सात दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीला देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार, हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नेत्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

देशात जीवघेण्या कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४,२७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. अनेक नेते मंडळींसह बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा