Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीकरण जोहरच्या बर्थडे पार्टीत सेलिब्रिटींसह ५५ गेस्टना कोरोनाची लागण

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत सेलिब्रिटींसह ५५ गेस्टना कोरोनाची लागण

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याने नुकताच आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. करण जोहरने यशराज फिल्म स्टुडिओमध्ये वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या पार्टीत हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांच्यासह इतर बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले होते.

मात्र, करण जोहरची वाढदिवसाची पार्टी सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरल्याचे समजतेय. कारण करणच्या पार्टीत सहभागी झालेल्यांमधील जवळपास ५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेने त्यांच्यावर कारवाईचे आदेशही दिले होते. आताही करणची पार्टी त्या बॉलीवू़डच्या सेलिब्रेटींसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. मात्र, अनेकांनी त्यांना कोरोना झाल्याची माहिती लपवली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. पण कार्तिक आर्यन करण जोहरच्या पार्टीमध्ये नव्हता. मात्र, अभिनेत्री कियारा आडवाणी या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर कियाराने कार्तिकसोबत त्यांच्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाचे प्रमोशन केले होते. त्यामुळे कार्तिकला कियारा आडवाणीमुळे कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -