Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे ग्रामीणमध्ये ‘एक गाव, एक शिक्षक’ उपक्रमाला सुरुवात

ठाणे ग्रामीणमध्ये ‘एक गाव, एक शिक्षक’ उपक्रमाला सुरुवात

मुरबाड तालुक्यातील ११ गावांमध्ये प्रकल्प

मुरबाड (वार्ताहर) : विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती व्हावी व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात कार्य केले जात आहे. याचाच भाग म्हणून निधी संकलन करणारी फीलंत्रो या संस्थेने मुरबाड तालुक्यातील ११ गावांमध्ये ‘एक गाव, एक शिक्षण’ हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणून वेल्फेअर सोसायटी फॉर डिस्टिट्युट चिल्ड्रन संस्था गावातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या स्थानिक शिक्षकासह विद्यार्थ्यांना मोफत मदत करत आहे, अशी माहिती फिलान्ट्रोचे प्रवक्ते, सह-संस्थापक जीजी जॉन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुलांना त्यांची जात, धर्म किंवा आर्थिक स्थिती विचारात न घेता गावातच या नवीन अभ्यासासाठी प्रवेश मिळतो. एका गावात एका शिक्षकाने याची सुरुवात झाली असली तरी लवकरच प्रत्येक गावात तीन शिक्षकांची संख्या वाढणार आहे. जे विद्यार्थी ‘एक गाव, एक शिक्षक’ या उपक्रमामध्ये नावनोंदणी करतात. त्यांना ११वीपासून शिष्यवृत्ती दिली जाते. जेणेकरून ते पदवी पूर्ण होईपर्यंत पुढील अभ्यास चालू ठेवू शकतील. मुरबाडमधील ११ गावांमध्ये या प्रकल्पासाठी १५ शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक गावात सुमारे २५ ते ३० मुले एक गाव एक शिक्षक उपक्रमात नोंदणी करत सहभागी झाले आहेत. आरोग्य, शिक्षणासाठी फिलान्ट्रोचे सर्वात मोठे योगदान आहे.

मे २०२२ पर्यंत भारताची लोकसंख्या १.४ अब्ज आहे; परंतु कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे निरक्षरतेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारतात सक्तीच्या प्राथमिक बालशिक्षणासाठी राष्ट्रीय धोरण व बालकामगार धोरण असूनही ६ ते १८ वयोगटातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त भारतात मुले शाळेत जात नाहीत. या अडचणींमुळे मुलांना अभ्यास करण्याऐवजी काम करण्यास भाग पाडले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -