
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने शिवसेनेवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आणणारे ट्वीट करत मुंबई काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतल्याची माहिती दिली आहे.
https://twitter.com/ravirajaINC/status/1532579286120427521
मुंबई महानगरपालिकेच्या ६ एसटीपी प्रकल्पांविरोधात काँग्रेस सुप्रिम कोर्टात गेली आहे. महापालिकेद्वारे प्रदान केलेल्या ६ एसटीपी प्रकल्पांच्या अंदाजांचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकेला एक नवीन पुनरावलोकन समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत आणि फक्त २ वर्षात ५००० कोटींची वाढ झाली आहे, त्याची चौकशी व्हावी, या मागणीसाठी काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकल्पांचे पुनरावलोकन होईपर्यंत त्यांनी महापालिकेला निविदा प्रक्रियेवर स्थगिती आणण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही मुंबई काँग्रेसने सुप्रिम कोर्टात केली आहे.