Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

मुष्टियोद्धा महिलांनी घेतली मोदींची भेट

मुष्टियोद्धा महिलांनी घेतली मोदींची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेतील विजयी मुष्टियोद्धा महिला निखत जरीन, मनीषा मौन आणि परवीन हुड्डा यांनी भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि तिन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच चर्चा रंगली. खेळाडूंनी यावेळी आपले अनुभव मोदी यांना सांगितले.

‘महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला विजय मिळवून देणाऱ्या मुष्टियोद्धा निखत झरीन, मनीषा मौन आणि परवीन हुडा यांना भेटून मला आनंद झाला. आम्ही त्यांच्या खेळाबद्दलची आवडीचे आणि त्यापलीकडील जीवन प्रवासाविषयी संभाषण केले आहे. त्यांच्या भविष्यातील विजयासाठी शुभेच्छा’, अशा शब्दांत मोदी यांनी या खेळाडूंचे कौतुक केले.

गोल्डन गर्ल निखतला यावेळी पंतप्रधान यांनी आपली स्वाक्षरी दिली. निखतसाठी ही सर्वात मोठी अनमोल अशी भेट ठरली. या स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या परवीन हुड्डा आणि कांस्यपदक पटकावणाऱ्या मनीषा मौन हिलाही यावेळी पंतप्रधान यांनी आपली स्वाक्षरी दिली. या तिघींसाठीही पंतप्रधानांची सही हा एक अनमोल ठेवा होता. मोदी यांनी या तिन्ही खेळाडूंना यावेळी बॉक्सिंग ग्लोव्हजची खास भेट दिली. सुवर्णपदकविजेत्या निखत झरीनला यावेळी मोदी यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह काही आवरता आला नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा