बंगळुरु : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी इशारा देऊनही हिजाब घातल्याबद्दल सहा मुस्लिम विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या एका कारवाईत १२ विद्यार्थिनींना वर्गात असताना हिजाब परिधान केल्याबद्दल शाळेतून परत पाठवण्यात आले.
वृत्तसंस्था एएनआयने प्राचार्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, महाविद्यालयात विद्यार्थिनींनी हिजाब घालून प्रवेश केला होता, त्यामुळे कॉलेज प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. कालपासून मुस्लिम विद्यार्थिनींना सहा दिवसांसाठी निलंबित केलंय. दरम्यान, हिजाबच्या मार्गदर्शक तत्त्वांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी उप्पिनंगडी शासकीय प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या सहा विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांसोबत बैठक घेऊन विद्यार्थिनींना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तसेच सहा विद्यार्थिनींना सरकारी आदेश आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करुन दिली.
उडुपी प्री-युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेजच्या ६ विद्यार्थिनींनी सुरू केलेला हिजाबचा वाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने वर्गात हिजाबसह कोणतेही धार्मिक वस्त्र परिधान करण्याविरुद्ध निर्णय दिला. शाळांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या विद्यार्थिनींनी दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली होती.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…