Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आता अडीच तासाचा

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आता अडीच तासाचा

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून पुण्याला व पुण्याहून मुंबईला दोन तासात पोहचणे शक्य झालेले असतानाच आता रेल्वेनेही अडीच तासात मुंबईहून पुण्याला प्रवास करणे अवघ्या दीड महिन्याने शक्य होणार आहे. लवकरच महाराष्ट्राला पहिली 'वंदे भारत' ट्रेन मिळणार आहे. याद्वारे आपल्याला मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त २ तास ३० मिनटांत करता येणार आहे. १५ ऑगस्ट पर्यंत २ गाड्या महाराष्ट्राला मिळू शकतात.


१५ ऑगस्ट पर्यंत वंदे भारत ट्रेन मुंबई पुणे यादरम्यान धावणार असल्याची माहिती दिली आहे. आता उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून प्रवास केला तर आपल्याला मुंबई ते पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. पण वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यावर हा प्रवास अडीच तासावर येणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भारतात दोन महत्त्वाच्या शहारातील प्रवास वेगवान व्हावा यासाठी वंदे भारत या रेल्वे चालवण्यात येतात. येत्या दोन वर्षात तब्बल ४०० वंदे भारत ट्रेन संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये वाराणसी-नवी दिल्ली, वैष्णोदेवी-नवी दिल्ली या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. त्यामध्ये आता महाराष्ट्रातील मुंबई-पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment