मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांपैकी कोणीही माघार घेतली नसल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता भाजप-शिवसेनेत चुरस वाढली आहे.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण ३० च्या आसपास मते आहेत. त्यामुळे उर्वरित १२ मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी ६ वाजता ही बैठक पार पडणार आहे.