नाशिक (प्रतिनिधी) : मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना संरक्षण मिळाले आहे, तसेच कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ३ कोटींहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती यांसारख्या योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या ‘सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची
८ वर्षे’ या अभियानाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधुरी पालवे-पढार, प्रदेश वैद्यकीय आघाडी सहप्रमुख सोनल दगडे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, गोविंद बोरसे, सुरेश आण्णा पाटील आदी उपस्थित होते.