भाजपची मविआला ऑफर!

  66

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाने राज्यसभा निवडणूक बिनविरोध केली जाईल, त्या बदल्यात विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी ऑफर महाविकास आघाडीने दिली आहे. त्याच संदर्भात आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.


या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "काल महाविकास आघाडीच्या नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा निरोप आला. तीन पक्षाचे ज्येष्ठ नेते आले होते. राज्यसभेची निवडणूक १० तारखेला होणार आहे. आजवर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. राज्यसभेत भाजपला ३ जागा मिळाव्यात, विधान परिषदेसाठी काही विचार करता येईल. त्यांनी आम्हाला सांगितले की विधान परिषदेच्या ५ जागा देऊ, पण आम्हाला राज्यसभा जास्त महत्वाची आहे. आम्हाला ११ ते १२ मते कमी पडत आहेत. त्यांच्याकडे असलेली संख्या आमच्या ३० च्या पुढे जात नाही.


चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, "आम्ही तिसरी जागा लढणे आणि जिंकणे यावर ठाम आहोत. त्यांनी जर आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणार. आज खूप चांगली चर्चा झाली पण आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. पार्टीचा उमेदवार मागे घेणे हे शक्य नाही. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातले आहे. ते म्हणाले तुमची भूमिका योग्य आहे. त्यांनी जर त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही तर आम्ही लढू. जर त्यांनी आता सहकार्य केले तर आम्ही विधान परिषदेत करू."

Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना

शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण

प्रत्येकाला विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्ग होणार - नितेश राणे

महामार्गाचा सध्याचा प्लॅन १०० टक्के बदलणार पालकमंत्री म्हणून प्रत्येकाशी संवाद साधण्यास मी तयार सिंधुदुर्ग :

कुरियरवाला असल्याचे सांगत तरुणीवर बलात्कार प्रकरणी, पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन  पुणे: कोंढवा