Sunday, October 26, 2025
Happy Diwali

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ जाणार वेस्ट इंडिज दौऱ्यावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ जाणार वेस्ट इंडिज दौऱ्यावर

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तयारी करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजबरोबर तीन वनडे आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारताचा वेस्ट इंडिजमधील दौरा २२ जुलैला सुरु होणार आहे, हा दौरा ७ ऑगस्टपर्यंत असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये २२ जुलैला पहिला वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा वनडे सामना हा २४ जुलै आणि तिसरा वनडे सामना हा २७ जुलैला होणार आहे.

अन्य दोन्ही वनडे सामने हे पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हलवर होणार आहे. तिन्ही वनडे सामने हे संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ही २९ जुलैपासून सुरु होणार आहे.

Comments
Add Comment