Friday, December 13, 2024
Homeमहत्वाची बातमी७० टक्के ट्रक चालकांना तंबाखूचे व्यसन

७० टक्के ट्रक चालकांना तंबाखूचे व्यसन

तंबाखू चघळण्याच्या सवयीमुळे तोंडाचे आजार

मुंबई : नुकताच साजऱ्या केलेल्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुंबई व लगतच्या शहरांमध्ये तंबाखू सेवनाचे दुष्परिणामाबाबत जागरूकता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दिनाचे औचित्य साधून तंबाखूच्या व्यसनाने शरीराचे कोणते नुकसान होते हे समजविण्यासाठी मुलुंड येथील प्लॅटिनम हॉस्पिटलने एक अनोखा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात थेट मुंबई व नाशिक येथील १५० ट्रक ड्राइवर व क्लीनर यांची कर्करोग तपासणी करण्यात आली .

श्री नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या माध्यमातून हा उपक्रम नाशिक-विल्होळी येथील ट्रक गोदामामध्ये आयोजित करण्यात आला होता. याविषयी अधिक माहिती देताना प्लॅटिनम हॉस्पिटलचे कर्करोगतज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. मकरंद भोले म्हणाले, प्लॅटिनम हॉस्पिटलच्या माध्यमातून फक्त कर्करोग तपासणीच नाही तर आम्ही या ट्रक चालकांचे तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन सुद्धा केले.

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ड्रायविंग क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना वयाच्या १५ ते १६ वर्षांमध्येच तंबाखूचे व्यसन लागलेले असते. ट्रक चालविण्याच्या निमित्ताने कधीकधी १५ दिवस तर कधी कधी १ महिना घराच्या बाहेर राहावे लागते त्यामुळे त्यांना हे तंबाखूचे व्यसन जडते.

तंबाखूमध्ये असणाऱ्या निकोटिनमुळे ही सवय सोडणे फार अवघड बनते व ती व्यक्ती व्यसनाच्या जास्तच आधीन होतो त्यामुळे त्यांना दर सहा महिन्यांनी समुपदेशनाची गरज आहे. प्रथमतः एक वेळ घालविण्यासाठी दिवसातून एक-दोन वेळा तंबाखू खाण्यास सुरुवात होते व काही दिवसांमध्ये या सवयीचे रूपांतर व्यसनामध्ये होते.

हळूहळू निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल झाल्यानंतर आधी बसणारी तंबाखूची कीक बसेनाशी होते व शरीर जास्त निकोटीनची मागणी करु लागते व २४ तास ती व्यक्ती सतत तंबाखूच्या संपर्कात राहतो. तंबाखूचे पाकीट व चूना खिशात बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला समजतही नाही, परिणामतः या व्यसनाकडे घरच्या लोकांचे अजाणतेपणी तर कधी कधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते.

तंबाखूमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक घटक असतात. तंबाखू, सिगारेट, विडी, मशेरी, गुटखा, खर्रा च्या सेवनामुळे हृदयरोग, अर्धांगवायू, कर्करोग यासारखे आजार होण्याचा धोका असतो. आजमितीला महाराष्ट्रातील ७० टक्के ट्रक ड्रायव्हर हे तंबाखूच्या व्यसनाने पीडित असून हे व्यसन सोडण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले पाहिजे, अशी माहिती प्लॅटिनम हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ. मकरंद भोले यांनी दिले. या कार्यक्रमाला व्हिलोळी येथील वाहतूक तसेच आरटीओ विभागाचे सहकार्य लाभले, यावेळी २५ वाहतूक पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -