नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. गांधी यांना बुधवारी सौम्य ताप आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. आज या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरजेवालांनी असेही सांगितले की, यापूर्वी सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या, त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.
८ जूनपूर्वी सोनिया गांधी बऱ्या होतील, अशी आशा सुरजेवालांनी व्यक्त केली आहे. ८ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे.