
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून एकूण १७ जणांची हत्या घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व हत्या अतिशय किरकोळ कारणांवरून घडल्याचे स्पष्ट होत आहे.
शहर व ग्रामीण पोलीस गुन्हेगारीचा आलेख कमी असल्याचे सांगत असले तरी खून, विनयभंग, घरफोड्या, वाहनचोऱ्या व चेनस्नॅचिंगच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून केला जाणारा दावा फोल ठरत आहे. यामध्ये नाशिक शहरात दोन आठवड्यात तब्बल सहा खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरात १० खुनाच्या घटना घडल्या.
अशा एकूण १७ जणांची हत्या घडली आहे. विशेष म्हणजे या सर्व कौटुंबिक वाद, शुल्लक कारण यातूनच या घटल्याचे सामजते. पोलिसांचा धाक किती आहे हे यावरून स्पष्ट होते.
दरम्यान, झालेल्या एकूण हत्या या मागील भांडणाची कुरापत, मध्यस्थी केल्याने, तसेच अनैतिक संबध, पती-पत्नीतील वाद व लुटमारीच्या उद्देशाने झाल्या असून, सर्वच प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस दलाकडून सातत्याने गुन्हेगारांवर विविध प्रकारची कारवाई केली जात आहे परंतु पोलिसांचे धाक हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये राहिला नसल्याचे समोर येत आहे त्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे.