मुंबई : गेल्या साधारण आठवड्याभरापासून रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोना केसेस हाताबाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आणि शक्य तिथे मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यातल्या कोरोनाच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सध्या काळजीचे वातावरण आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पण एकदा का कोरोना रुग्णांची संख्या वाढली की ती कशी पटकन हाताबाहेर जाते, हे आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटेदरम्यान बघितले आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.
याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, “आम्ही इंधन दरामध्ये शक्य तेवढी कपात केलेली आहे. पण अजून २०१९ पासून जीएसटी परताव्याची रक्कम येणे बाकी आहे. तरी केंद्र सरकारने इंधन दरात कपात केल्यानंतर आम्हीही दरकपात केली. साडेतीन हजार कोटी रुपये जे राज्याच्या तिजोरीत येणार होते, त्याचा वापर लोकांच्या फायद्यासाठी केला आहे. त्यापेक्षा मोठा निर्णय़ सीएनजी, गॅसच्या दर कपातीबद्दल घेतला आहे.”
अजित पवार पुढे म्हणाले, “आता परवा काही महंत चर्चेला बसले. एकमेकांवर माईकचा बूम उगारला. त्याचे काल भुजबळांनी प्रात्यक्षिक दाखवले. या सगळ्यातून आपण काय मिळवणार आहोत याचा विचार सर्वांनी करावा.”