सद्गुरू वामनराव पै
इतिहासकालापासून आजतागायत जगात ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्याचे एकमेव कारण परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे होय. माणसाला परमेश्वराबद्दलचे ज्ञान होईल, तेव्हा सर्वच समस्या नाही होतील. असे मी म्हणणार नाही. पण ९५ टक्के समस्या या निश्चित सुटू शकतील. १५ टक्के समस्या या इतरांमुळे निर्माण होतात. एखादा माणूस बसस्टॉपला उभा आहे. एखादया ट्रकचालकाचा ताबा सुटला व तो ट्रक सरळ बसस्टॉपवर घुसला व त्यात या माणसाचा जीव गेला. तो माणूस जगातून गेला त्यात या माणसाचा काय दोष होता? ५ टक्के समस्या या इतरांमुळे व ९५ टक्के समस्या या आपल्यामुळे निर्माण होतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी परमेश्वराबद्दलचे ज्ञान होणे आवश्यक आहे. पण परमेश्वराबद्दलचे अज्ञान इतके प्रचंड आहे की, देवाच्या भक्तीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आज सर्व ठिकाणी अनेक अनिष्ट गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. देवाधर्माच्या नावाखाली दंगे, दशहतवाद, भांडणतंटे होतात. माणसे एकाच धर्माची असली तरी भांडणे करतात. पाच भाऊ हिंदू आहेत तरी भांडतात. पाच मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत तरी भांडतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, एकाच धर्माचे लोक असले तरी ते सुखी होतीलच असे नाही. तो कुठल्याही धर्माचा असू दे. पण त्याला देव म्हणजे काय हे माहीत नाही, धर्म म्हणजे काय हे माहीत नाही, तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य कुणातही नाही. जगात कुणीच सुखी नाही. “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे.” आज जगात कोण सुखी आहे? श्रीमंत माणूस तोही दुःखी, गरीब हे गरीबीमुळे दुःखी. सत्ताधीशाला काही कमी आहे का, तरीही त्यांना दुःख आहेच ते का? आपण पुन्हा निवडून येऊ का? निवडून आल्यावर मंत्रीपद मिळेल का? आणि मिळाले तरी ते टिकेल का? विद्वान असला तरी तोही दुःखी असतोच. याचे कारण शोधून काढत नाहीत. हेच जीवनविद्येने शोधून काढले ते म्हणजे परमेश्वराबद्दलचे अज्ञान. परमेश्वराबद्दलचे ज्ञान होईल तेव्हा जगातल्या समस्या दूर होतील. जगातल्या समस्या दूर झाल्या की, माणसाच्याही समस्या दूर झाल्याच. आज एक माणूस दुसऱ्या माणसाचे दुःख निर्माण करतो. एक शहाणा आहे. पण बाकीचे वेडे असतील, तर कसे होणार? घरात दहा माणसे आहेत. त्यात एकच शहाणा व बाकीचे वेडे असतील, तर वेड्यांची संख्या जास्त असल्यामुळे हा शहाणा त्यांना सुखी करू शकत नाही. जेव्हा माणसे शहाणी होतील तेव्हाच ती सुखी होतील. माझा एक सिद्धांत आहे, माणसाकडे शहाणपण येईल तेव्हा तो सुखी होईल. मी “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या ग्रंथात लिहून ठेवलेले आहे की शहाणपण हाच धर्माचा आत्मा आहे.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…