Sunday, March 23, 2025
Homeक्रीडातेंडुलकरने निवडला स्वप्नातला आयपीएल २०२२चा सर्वोत्तम संघ

तेंडुलकरने निवडला स्वप्नातला आयपीएल २०२२चा सर्वोत्तम संघ

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा १५वा हंगाम सरला असला तरी त्याची झिंग अद्याप कायम आहे. त्यातूनच भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याने त्याचा सर्वोत्तम आयपीएल २०२२ संघ निवडला आहे. त्यामध्ये सचिनने या मोसमातील सर्वोत्तम खेळाडूंना स्थान दिले आहे. सचिनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या संघाबाबत माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे त्याने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचाही समावेश केला आहे. सचिन म्हणाला, ‘शिखर धवन आणि जोस बटलर हे माझे सलामीवीर असतील. बटलरसाठी हा हंगाम चांगला आहे. धवनशिवाय इतर कोणताही फलंदाज त्याचा जोडीदार होऊ शकत नाही’. के. एल. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्यानंतर सचिनने हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात घेतले आहे.

पंड्याबाबत सचिन म्हणाला, ‘चौथ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पंड्याने या मोसमात जबरदस्त फॉर्म दाखविला आणि काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या. त्याच्यात जबरदस्त ताकद आहे व त्याच्या बॅटचा स्विंग सुंदर आहे. या मोसमात हार्दिक हा सर्वोत्तम कर्णधार होता’.

सचिन तेंडुलकरचा संघ –

शिखर धवन, जोस बटलर, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), राशिद खान, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -