Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडालाल मातीचा बादशाह नदालची फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक

लाल मातीचा बादशाह नदालची फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक

कट्टर प्रतिस्पर्धी जोकोविचचा केला पराभव

ओपन टेनिसच्या १९६८ मध्ये सुरू झालेल्या हंगामात आतापर्यंत १३ वेळा ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद जिंकणारा नदाल हा जगातील पहिला खेळाडू आहे. तर दुसरीकडे, नदालसह २१वा ग्रँडस्लॅम सामना जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न भंगले आहे.

पॅरिस (वृत्तसंस्था) : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने फ्रेंच ओपन २०२२ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मंगळवारी उशिरा खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित नदालने कट्टर प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोविचचा ६-२, ४-६, ६-२, ७-६ असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंमधील सामना ४ तास १२ मिनिटे चालला. यासह आता उपांत्य फेरीत नदालचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याशी होणार आहे. झ्वेरेव्ह याने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या कार्लोस एलकराझचा चुरशीच्या लढतीत पराभव केला.

राफेल नदाल याचा जगातील नंबर वन नोव्हाक जोकोविचविरुद्धचा हा २९ वा विजय आहे. याआधी दोन्ही खेळाडूंमधील ५८ सामन्यांत जोकोविचने ३० तर नदालने २८ सामने जिंकले होते. या विजयासह ३५ वर्षीय राफेल नदालने फ्रेंच ओपनमधील गेल्या मोसमातील पराभवाचा हिशेब चुकता केला. जोकोविचने २०२१ च्या मोसमात उपांत्य फेरीच्या सामन्यात नदालला ३-६, ६-३, ७-६, ६-२ असे पराभूत करून स्पर्धेबाहेर केले होते. विशेष बाब म्हणजे राफेल नदालचा फ्रेंच ओपन टेनिसमधला हा ११० वा विजय आहे. याशिवाय नदालला या स्पर्धेत केवळ तीन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दिग्गजांमध्ये असा रंगला सामना

पहिल्याच गेममध्ये सर्बियन खेळाडूची सर्व्हिस मोडून नदालने जोकोविचविरुद्धच्या सामन्याला शानदार सुरुवात केली. परिणामी नदालने पहिला सेट सहज जिंकला. त्यानंतर जोकोविचने ८८ मिनिटे चाललेला दुसरा सेट जिंकून सामन्यात पुनरागमन केले. पण ३५ वर्षीय नदालने तिसरा आणि चौथा सेट जिंकून जोकोविचला स्पर्धेतून बाहेर काढले. चौथ्या सेटमध्ये नदालची सर्व्हिस तोडल्याने जोकोविचला २-२ अशी बरोबरी साधण्याची संधी मिळाली.

नदालकडे सर्वाधिक जेतेपदे

नदालला लाल मातीचा राजा (क्ले कोर्ट) म्हटले जाते आणि यामागचे कारणही तसे आहे. स्पेनच्या या दिग्गज टेनिसपटूने १३ फ्रेंच ओपन टेनिसचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच टेनिसच्या इतिहासात राफेल नदालने सर्वाधिक पुरुषांचे ग्रँडस्लॅम देखील पटकावले आहेत. त्याच्या नावावर एकूण २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे असून नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर हे नदालच्या मागे आहेत. दोन्ही खेळाडूंनी २०-२० ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -