भारताच्या महिला रायफल संघाला सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला संघाने मंगळवारी अजरबैजानमधील बाकू येथे आयोजित ‘आयएसएसएफ’ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. रमिता, ईलाव्हेनिल वालारिवान आणि श्रेया अग्रवालने अचूक नेम साधून महिलांच्या सांघिक १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेत भारताच्या पदकांचे खाते उघडले.


भारतीय महिला संघाने फायनलमध्ये डेन्मार्कचा १७-५ ने पराभव केला. त्यामुळे भारतीय महिला संघाला सोनेरी यश संपादन करता आले. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला त्रिकुटाने डेन्मार्कच्या अॅना निलसन, एमा कूच आणि रिकी माएंग इब्सनला १७-५ असे नमवले. या गटात पोलंड महिला संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.


दुसरीकडे, महाराष्ट्राच्या युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलसह पार्थ मखिजा आणि धनुष श्रीकांत हे एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये चौथ्या स्थानी राहिले. भारताच्या पुरुष संघाला या गटाच्या लढतीत क्रोएशियाकडून पराभव पत्कारावा लागला.


माजी अग्रमानांकित वालारिवान, रमिता आणि श्रेया यांनी सोमवारी दोन टप्प्यांच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारली होती. भारतीय महिलांनी पहिल्या टप्प्याच्या पात्रता फेरीत ९० फैरींमध्ये ९४४.४ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डेन्मार्कपाठोपाठ दुसरे स्थान मिळवत भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : चालू स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाची जबाबदारी नवीन कर्णधारावर ?

मुंबई : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या थरारक सामन्यांना आजपासून सुरूवात होत आहे. आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड

जाएंट किलर संघ भारताच्या वाट्याला...

अहमदाबाद  : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांची नजर 'सुपर-८' फेरीकडे लागली आहे. भारतीय

भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत

कांगारूंच्या भूमीत तिरंगा फडकवण्याची महिला संघाला संधी ॲडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामधील टी-२०

शेवट गोड झाला, ऑस्ट्रेलियाचा ओमान विरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव

R Ashwin : 'भारतीय संघाला हरवणे कठीण'; रविचंद्रन अश्विनने केले सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रिकी पॉन्टिंग कडून घरचा आहेर

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत