मुंबई (प्रतिनिधी) : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आफ्रिकन नागरिकाने चार जणांवर ब्लेडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफ्रिकन वंशाच्या नागरिकाला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
ही घटना मुंबई उच्च न्यायालयाजवळ घडली आहे. तिथे एका आफ्रिकन वंशाच्या नागरिकाने अचानक आसपासच्या लोकांवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तेथे उपस्थित लोकांनी कसेबसे आरोपीवर नियंत्रण मिळवले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने लोकांवर ब्लेडने हल्ला केला तेव्हा तो ड्रग्जच्या नशेत होता, असे सांगितले जात आहे.
आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून, तो नशेत होता का, याचा तपास केला जात आहे. आरोपीने लोकांवर ब्लेडने का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…