Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेचार वर्षांच्या कष्टाचे झाले चीज...

चार वर्षांच्या कष्टाचे झाले चीज…

शहापूरचा नीरज पाटील यूपीएससीत ५६० रँकने उत्तीर्ण

शहापूर (वार्ताहर) : देशातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत शहापूर तालुक्यातील टहारपूर विद्यालयाचे शिक्षक विजय पाटील व साखरोली जि. प. शाळेच्या शिक्षिका ललिता पाटील यांचा मुलगा नीरज पाटीलने घवघवीत यश मिळवले आहे. गेल्या चार वर्षांपासून नीरज जीवतोड मेहनत करत होता. अखेर त्याच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान नीरजच्या वडिलांनी बोलून दाखवले. यूपीएससीच्या अंतिम निकालात नीरज ५६० रँक घेऊन उत्तीर्ण झाला.

इंजिनिअर झाल्यावर नीरज स्वस्थ बसला नाही. त्याला नागरी सेवेत जायचे होते. त्यादृष्टीने त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली़ त्यासाठी त्यांनी पुणे येथे युनिक ॲकॅडमीमध्ये अभ्यास सुरू केला़ जीवतोड मेहनतीचे फळ म्हणून मागील वर्षी त्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये नागपूर येथे क्लासवन पोस्टवर व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली.

मात्र त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सोडली नाही. अखेर आपल्या स्वप्नरूपी वृटवृक्षाला त्याने नियमित अभ्यासाचे खतपाणी घातले आणि यश खेचून आणले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -