Saturday, March 22, 2025
Homeमहाराष्ट्रपालघररिक्त जागामुळे अंगणवाडी सेविकांचा वाढला ताण

रिक्त जागामुळे अंगणवाडी सेविकांचा वाढला ताण

जव्हार (प्रतिनिधी) : लहान बालकांपासून गरोदर महिला व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून ते आवश्यक संतुलित व समतोल आहार यांचे सुयोग्य नियोजन करून तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न अंगणवाडी सेविका करीत असतात. मात्र अंगणवाडी सेविकांच्या तीन, मदतनीसांच्या सहा तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या दोन अशा ११ जागा रिक्त असल्याने अंगणवाडी सेविकांवर कामाचा ताण वाढला आहे.

अंगणवाडी सेविकांना अनेक कामे दिली जात आहेत. शून्य ते सहा वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते. गरोदर मातांची माहिती संकलित करावी लागते. कामाच्या तुलनेत मानधन कमी आहे. शिवाय ज्या अंगणवाडी केंद्रात रिक्त जागा आहेत, अशा जागा भरल्यास अतिरिक्त असणारा ताण कमी होऊन अजून चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. जि. परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दोन दिवसांपूर्वीच तालुक्याचा आढावा घेतला, मात्र यात त्यांना मानधन तथा इतर अडचणी दिसल्या नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जव्हार तालुक्यात दोन प्रकल्प आहेत. प्रकल्प १ मध्ये १५३ केंद्र, प्रकल्प २ मध्ये १९१ केंद्र असून तालुक्यात एकूण ३५४ अंगणवाडी आहेत. सर्व ठिकाणी अमृत आहार अंगणवाडीतच देणे सुरू आहे. गरोदर माता १४८७, स्तनदा माता १४७४, लहान बालके ३ वर्षापर्यंत ६६३६ मोठी ३ ते ६ वर्षांची बालके, ७८०३ इतकी आहेत. मानधन कमी तसेच वेळेवर मिळत नाही. दोन महिन्यांचे वेतन एकदाच मिळते, असे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.

जव्हार तालुक्यात अंगणवाडी प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. रिक्त जागा भरण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा केली आहे. मानधन नियमितपणे मिळावे यासाठी दोन्ही प्रकल्पाला सूचना केल्या आहेत. शिवाय जिल्हास्तरावर देखील हो बाब निदर्शनास आणली आहे. – सुरेश कोरडा, सभापती, पंचायत समिती, जव्हार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -