टाइमपास ३ चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

  155

मुंबई : हम गरीब हुए तो क्या हुआ! चला, हवा येऊ द्या! नया है वह! आई बाबा आणि साईबाबाची शपथ यासारख्या हिट संवादांनी नटलेला, दगडू - प्राजू, कोंबडा, मलेरिया, बालभारती, शाकाल उर्फ माधव लेले अशा अतरंगी पात्रांनी सजलेला आणि मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी धमाल उडवून देणारा चित्रपट म्हणजे टाइमपास! झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेले टाइमपास आणि टाइमपास २ हे दोन्ही चित्रपट कमालीचे लोकप्रिय ठरले. टाइमपासमध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट टाइमपास २ मध्ये पूर्ण झाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



टाइमपास ३ ची ही गोष्ट दगडू-प्राजुच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे म्हणजे कुमारवयातल्या दगडूची! आणि या कथेत आला आहे नवा ट्विस्ट ज्याचं नाव आहे ''पालवी दिनकर पाटील''! टाइमपास ३ च्या टिझरच्या केंद्रस्थानी आहे ही डॅशिंग पालवी! जी साकारली आहे लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने. याशिवाय प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले यांचा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेमकी गोष्ट काय असणार आहे? ही पालवी कोण आहे? चित्रपटात प्राजू दिसणार की नाही? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतील पण त्याची उत्तरे हळूहळू मिळतच जातील. तूर्तास तिसऱ्या भागाच्या या टिझरने उत्सुकता वाढवली आहे हे निश्चित!


झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांचे आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments
Add Comment

प्रिया बापट आणि उमेश कामत सांगणार 'बिन लग्नाची गोष्ट'

१२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी

वरळी सी-लिंकवर स्टंट केल्याप्रकरणी गायक यासेर देसाई विरोधात गुन्हा दाखल

मुंबई: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आणि गीतकार यासेर देसाई याने मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंकवर स्टंट करत शूट

Kareena Kapoor Khan: तैमूर, जेहनंतर पुन्हा पटौदींच्या घरात पाळणा हलणार? करीनाच्या व्हेकेशन फोटोंमुळे चर्चांना उधाण

मुंबई : बॉलीवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आपल्या क्लासी आणि हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

"बेघर होऊ देणार नाही! : "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना ग्वाही

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले

'दशावतार' चित्रपटाचा फर्स्ट लूक आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला; अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. आगामी मराठी चित्रपट 'दशावतार' चा फर्स्ट

Neena Gupta Post: ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ताने शेअर केली कोल्हापुरी चप्पल विषयी पोस्ट, लक्ष्मीकांत बेर्डेंचा केला उल्लेख

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केली होती निना यांना कोल्हापुरी चप्पल भेट मुंबई: प्राडा विरुद्ध कोल्हापुरी (Prada vs Kolhapuri)