Wednesday, July 24, 2024
Homeमनोरंजनटाइमपास ३ चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

टाइमपास ३ चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : हम गरीब हुए तो क्या हुआ! चला, हवा येऊ द्या! नया है वह! आई बाबा आणि साईबाबाची शपथ यासारख्या हिट संवादांनी नटलेला, दगडू – प्राजू, कोंबडा, मलेरिया, बालभारती, शाकाल उर्फ माधव लेले अशा अतरंगी पात्रांनी सजलेला आणि मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी धमाल उडवून देणारा चित्रपट म्हणजे टाइमपास! झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेले टाइमपास आणि टाइमपास २ हे दोन्ही चित्रपट कमालीचे लोकप्रिय ठरले. टाइमपासमध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट टाइमपास २ मध्ये पूर्ण झाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

टाइमपास ३ ची ही गोष्ट दगडू-प्राजुच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे म्हणजे कुमारवयातल्या दगडूची! आणि या कथेत आला आहे नवा ट्विस्ट ज्याचं नाव आहे ”पालवी दिनकर पाटील”! टाइमपास ३ च्या टिझरच्या केंद्रस्थानी आहे ही डॅशिंग पालवी! जी साकारली आहे लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने. याशिवाय प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले यांचा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेमकी गोष्ट काय असणार आहे? ही पालवी कोण आहे? चित्रपटात प्राजू दिसणार की नाही? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतील पण त्याची उत्तरे हळूहळू मिळतच जातील. तूर्तास तिसऱ्या भागाच्या या टिझरने उत्सुकता वाढवली आहे हे निश्चित!

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांचे आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -