Sunday, June 22, 2025

मुंबईत ज्या दुकानांच्या पाट्या मराठीत नाहीत त्यांना पुढील आठवड्यापासून दणका

मुंबईत ज्या दुकानांच्या पाट्या मराठीत नाहीत त्यांना पुढील आठवड्यापासून दणका

मुंबई : मुंबईतील ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाहीत त्या दुकानांवर आता पुढील आठवड्यापासून महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने आस्थापनांचे नामफलक ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत, असा आदेश महापालिकेने काढला आहे, त्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.


याबाबत राज्य सरकारचा शासन निर्णय १७ मार्च २०२२ रोजी जारी करण्यात आला. तसेच महापालिकेनेही परिपत्रक काढून मुंबईतील दुकाने तसेच आस्थापनांना नामफलक मराठीत रुपांतरीत करण्याविषयी आवाहन केले होते. अनेक दुकानांनी आपले इंग्रजी नामफलक बदलून मराठी केले आहेत. मात्र, अजूनही अनेक दुकानांचे नामफलक मोठ्या इंग्रजी अक्षरातच आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन पुढील एका आठवड्यापर्यंत सर्वेक्षण करुन कारवाई करणार आहे.


तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे असू नयेत. या नियमाचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.

Comments
Add Comment