Sunday, July 6, 2025

ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या २०२२ आरक्षणाची सोडत पालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडली आहे. पालिकेत अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग आणि महिलांसाठी दोन प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग आरक्षित होणार असल्याने ओबीसीच्या जागी खुल्या प्रवर्गातील इच्छुकाला संधी मिळाली आहे.


या निवडणुकीत ७१ महिला तर ७१ पुरुष उमेदवार असणार आहेत. ४६ प्रभाग हे तिनचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. १४२ पैकी १० जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहे. त्यापैकी ५ जागा या महिलांसाठी असतील.


अनुसूचित जातींचे आरक्षण


निवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी ०३, १०, १२, ०५, २३, २४, २७, २९, ३४ आणि ३४ या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी ०३, १२, १५, २३ आणि २९ प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.


अनुसूचित जमातींचे आरक्षण


अनुसूचित जमातींसाठी ०५ अ, ०६ अ आणि २९ ब हे प्रभाग निवडणूक आयोगोने थेट आरक्षित केले होते. त्यापैकी ०५ अ आणि २९ ब हे दोन प्रभाग अनु. जमातीच्या महिलांसाठी राखीव झाले आहेत.


महिलांचा खुला प्रवर्ग


१४२ पैकी ७१ जागांवर महिला निवडून येणार आहेत. ६४ जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. त्यापैकी ४७ जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. उर्वरित १७ जागांसाठी चिठ्ठीद्वारे महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४२ सह एकूण १८ प्रभागांमध्ये सर्वसाधरण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह ६ प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडणून येणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा