कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक दोन वर्षापासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाने वेग पकडला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 44 वॉर्डमधून 133 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. यातील 58 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 7 जागा अनुसूचित जाती तर 2 जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर 6 जागा अनुसूचित जातींसाठी, तर 2 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असून 58 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत.
आज सोडतीत प्रत्येक प्रभागातील एक जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याने नव्या पॅनल पद्धतीत समाविष्ट झालेल्या दिग्गज नगरसेवकाचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. या दिग्गजांना उर्वरित दोन जागेवरील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
महापालिकेतील जागा
एकूण सदस्य : 133 महिला : 67
अनुसूचित जाती : 13, महिला : 07
अनुसूचित जमाती : 04, महिला : 02
सर्वसाधारण 116, महिला 58
3 सदस्यांचे 43 प्रभाग सरासरी लोकसंख्या 34,258
4 सदस्यांचा 1 प्रभाग सरासरी लोकसंख्या 45 हजार 677
कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या जागा आरक्षित
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी – 2 अ ,15 अ, 19 अ, 22 अ, 25 अ, 44 अ
अनुसूचित जाती (महिला) – 4 अ, 6 अ, 7 अ, 17 अ, 20 अ, 23 अ, 43 अ
अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्ग – 5 अ, 21 अ
अनुसूचित जमाती महिला- 6 ब, 19 ब
सर्वसाधारण महिला – 1अ, 2ब, 3अ-ब, 4 ब, 5 ब, 7ब, 8ब, 9अ, 10अ-ब, 11 अ-ब, 12अ, 13 अ-ब, 14 अ-ब, 15 ब, 16 अ, 17 ब, 18 अ, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 ब, 24 अ-ब, 25 ब, 26 अ, 27 अ-ब, 28 अ-ब, 29 अ, 30 अ-ब, 31अ, 32 अ-ब, 33 अ, 34 अ-ब, 35 अ-ब, 36 अ-ब, 37 अ, 38 अ, 39 अ, 40 अ, 41 अ-ब, 42 अ, 43 ब, 44 ब-ड
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…