Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरडिजिटल सातबारा शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी

डिजिटल सातबारा शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी

पीक कर्जासाठी बळीराजाची लगबग

संदीप जाधव

बोईसर : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. त्यासाठी महत्त्वाचा दाखला हा सातबारा उतारा आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून डिजिटल सातबाराची सर्वर डाउन तसेच नेटवर्कचा खोळंबा असल्याने शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्र, सेतू कार्यालयात तासंतास थांबावे लागत आहे.

कधी कधी डिजिटल सातबारा निघत नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागत आहे. परिणामी उतारा भावी कामे खोळंबली असून शेतकरी हैराण झाला आहे. डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महसूल खात्याने सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून दिले, मात्र सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना दाखला काढता येणे अवघड बनले आहे.

शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह सातबाराची ही मागणी केली जाते. तसेच सध्या पीक कर्ज काढण्यासाठी लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांना सातबारा आवश्यक आहे. सर्वर डाऊन होत असल्याने शेतकरी डिजिटल सातबारा मिळणे अवघड झाले असून सेतू केंद्र व महा ई-सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांच्या चकरा वाढल्या आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय त्या भागातील महा-ई-सेवा केंद्र सेतू कार्यालय आदी ठिकाणी शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा मिळतो. दरम्यान, महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालयात डिजिटल सातबारा मिळणे कठीण झाले आहे. पर्यायी शेतकरी तलाठ्यांशी संपर्क करून सातबारा काढत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -