Friday, May 9, 2025

महामुंबई

ओळख दाखवून हरवलेले मोबाइल घेऊन जाण्याचे बेस्ट प्रशासनाचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट बसमध्ये महिन्याभरात प्रवाशांकडून विसरलेले तब्बल ४८ मोबाइल सापडले असून हे मोबाइल १३ जूनपर्यंत आपली ओळख दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


दरम्यान, बेस्टबसमध्ये प्रवास करताना प्रवाशांकडून मोबाईल विसरण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या मार्गावर चालणाऱ्या बसमध्ये प्रवासी मोबाइल विसरले आहेत. यात सॅमसंग, लिनोवो, नोकिया, व्हीओ, जिओ, रेडमी, ओप्पो यासह आय-फोनसारख्या मोबाइलचादेखील समावेश आहे.


तर ४८ मोबाईल सापडले असून यावर कुणी ही दावा केलेला नाही. तर बेस्टने या मोबाइलची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या कोणाचे हे मोबाइल आहेत त्यांनी कुलाबा येथील बेस्ट भवन येथून १३ जूनपर्यंत आपली ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment