Sunday, July 14, 2024
Homeक्रीडानाव बटलर, पण खरा ‘हिट’लर

नाव बटलर, पण खरा ‘हिट’लर

अहमदाबाद/ मुंबई (प्रतिनिधी) : ‘ऑरेंज कॅप’ आणि ‘मॅन ऑफ द सिझन’चा मानकरी राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर याने मात्र, ऑरेंज कॅपची शर्यत जिंकली आहे. त्याने आयपीएलच्या या हंगामात केवळ सर्वाधिक धावाच केल्या नाहीत, तर सर्वाधिक शतकेही ठोकण्याचीही किमया केली आहे. बटलरने यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये पहिल्या सामन्यापासून शेवटपर्यंत सातत्यपूर्ण फलंदाजी केली.

बटलरने ८३ चौकार आणि ४५ षटकारांच्या मदतीने आणि ५७.५३ च्या सरासरीने ८६३ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४९.०५ इतका जबरदस्त राहिला आहे. त्याने या हंगामामध्ये एकूण चार शतके आणि चार अर्ध शतके झळकावली आहेत. ११६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, तो विराट कोहलीचा चारपेक्षा जास्त शतकांचा विक्रम मोडू शकलेला नाही.

विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्या आसपासही दिसत नव्हता. जोस पाठोपाठ लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के.एल. राहुल याने १५ सामन्यात ६१६ धावा केल्या. लखनऊकडून खेळणाऱ्या क्विंटन डी कॉक याने तिसऱ्या क्रमांकावर राहत १५ सामन्यात ५०८ धावा केल्या. या सर्वांना मागे टाकून जोस फार पुढे गेला. मात्र, सातत्यपूर्ण खेळ करूनही त्याला आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यश आले नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि १५ लाख रुपये बक्षिस रक्कम दिली जाते. यावर्षी ही रक्कम जोस बटलरला देण्यात आली. याशिवाय त्याला ‘मॅन ऑफ द सिझन’च्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -