Saturday, July 20, 2024
Homeदेश'तो' पून्हा येतोय...!

‘तो’ पून्हा येतोय…!

देशात कोरोनाचे २७०६ नवे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना परतीच्या वाटेवर आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आकडेवारीने धडकी भरवली आहे. रविवारी गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक बाधित महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दिवसागणिक राज्यामध्ये केसेस वाढल्याचे दिसून येत आहे.

देशात गेल्या २४ तासांत २७०६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत कमी आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे.

त्याआधीच्या दिवशी २८२८ नवे कोरोना रुग्ण आणि १४ जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात १७ हजार ६९८ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

देशात रविवारी दिवसभरात २ हजार ७० रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २६ लाख १३ हजार ४४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या २५ नवीन मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या ५ लाख २५ हजार ६११ वर पोहचली आहे.

रविवारी गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक बाधितांची नोंद

राज्यात रविवारी नव्या ५५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. गेल्या चार दिवसांपासून पाचशेवर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांमध्ये बाधितांचा आकडा २ हजारांवर गेला आहे.

यापूर्वी राज्यात एक मार्च रोजी कोरोनाचे सर्वाधिक बाधित (६७५) आढळले होते. दुसरीकडे मुंबईमध्ये तब्बल १०८ दिवसांनी कोरोनाच्या दैनंदिन बाधितांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार, तर राज्यातील एकूण संख्या २ हजार ९९७ झाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दोन आकड्यांमध्ये गेली आहे. रविवारी १७ बाधित रुग्णालयात दाखल झाले. सेव्हन हिल्स डेप्युटी डीन डॉ. स्मिता चव्हाण यांनी यांनी सांगितले की, २५ कोरोना वॉर्डमध्ये, तर १० आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -