Tuesday, July 1, 2025

नेपाळ विमान अपघातातील २२ मृतांमध्ये ठाण्यातील चौघांचा समावेश

नेपाळ विमान अपघातातील २२ मृतांमध्ये ठाण्यातील चौघांचा समावेश

नवी दिल्ली : नेपाळमध्ये कोसळलेल्या अपघातग्रस्त विमानाचे फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागातील कोबानमध्ये या विमानाचे अवशेष सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की या विमानाचे तुकडे झाले. रेस्क्यू टीम आणि नेपाळी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व २२ जणांचा मृत्यू झाला आहे.


https://twitter.com/gauravpkh/status/1531153842439528448

या विमानात ४ भारतीय आणि ३ जपानी नागरिकांसह २२ प्रवासी होते. भारतीयांमध्ये ठाण्याच्या चौघांचा समावेश आहे. लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळ लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे पोहचले आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सैन्यदलासह स्थानिक लोकही मदत करत आहेत. अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. अपघातात ज्या भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ते चौघेही महाराष्ट्रातील ठाण्याचे रहिवासी होते. अशोक कुमार त्रिपाठी, पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी आणि दोन मुले धनुष आणि रितीका अशी त्यांची नावे आहेत.


या विमानाने पोखरा ते जोमसोमसाठी सकाळी ९.५५ वाजता उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्याच्या १५ मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर अपघात झाल्याची माहिती समोर आली.


स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, विमान मानपती हिमालय भूस्खलनात लामचे नदीच्या मुखाशी कोसळले आहे. नेपाळचे पत्रकार गौरव पोखरेल यांनी या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत.

Comments
Add Comment