Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेस्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य मोदी-आदित्यनाथ यांच्याकडून...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य मोदी-आदित्यनाथ यांच्याकडून…

सुनील देवधर यांचे प्रतिपादन

ठाणे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना हिंदुत्वाची शक्ती मिळाली. सावरकरांचे हिंदुत्व व भाजपचे हिंदुत्व यात काहीही फरक नसून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करीत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी शनिवारी येथे केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहर भाजपतर्फे गडकरी रंगायतनमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे ‘सावरकरांचा राजकीय संघर्ष’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भारत विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे, भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, ज्येष्ठ पत्रकार किरण शेलार, भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्टचे आकाश राऊत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी स्वातंत्र्यवीरांच्या साहित्य सागराला वाहिलेले नम्र नृत्य ‘स्वातंत्र्य सूर्य’ हा कार्यक्रम सादर केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रप्रेम काय असते, ते जगाला दाखवून दिले. त्यांच्या कार्यातून पुढील अनेक दशके तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ठाणे व सावरकर यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपचे शहर उपाध्यक्ष सचिन बी. मोरे यांनी सहकार्य केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -