Thursday, July 18, 2024
Homeमहामुंबईसिप्झ-सेझने केली १.५ लाख कोटी रुपयांची विक्रमी निर्यात

सिप्झ-सेझने केली १.५ लाख कोटी रुपयांची विक्रमी निर्यात

  • ८०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक
  • ५.६ लाख लोकांसाठी रोजगारनिर्मिती केली

मुंबई (प्रतिनिधी) : सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनने (सिप्झ) आज सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमांची सुरुवात केली. उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात सिप्झचे विकास आयुक्त शाम जगन्नाथन यांनी व्हिंटेज-कार ड्राइव्हला हिरवा झेंडा दाखवून केली. “सिप्झने मागील वर्षात अभूतपूर्व वाढ नोंदवली असून १.५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी निर्यात, ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणि ५ लाख ६० हजार लोकांसाठी रोजगार निर्मिती केली आहे.

विंटेज आणि क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (VCCCI)च्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुंबईतील आघाडीच्या विंटेज कारमालक आणि दर्दी रसिक यांचा सहभाग होता. यानंतर उद्घाटन समारंभात सिप्झ-सेझचे महत्त्व आणि त्याचे असंख्य पैलू उलगडून दाखवणारा लघुपट दाखवण्यात आला.

या प्रसंगी बोलताना, सिप्झचे विकास आयुक्त जगन्नाथन यांनी सिप्झ-सेझ २.० साठी कल्पना सामायिक केली. ज्यामध्ये या संपूर्ण क्षेत्राचा कायापालट समाविष्ट आहे. सिप्झ-सेझचे नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या पुनर्विकास योजनेची त्यांनी यावेळी माहिती दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या वर्षी या प्रकल्पाची घोषणा केली होती.

यामध्ये देशातील अशा प्रकारचे पहिले भव्य सामायिक सुविधा केंद्र (CFC) स्थापन करण्याचा समावेश आहे, जे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच रत्ने आणि दागिन्यांच्या उत्पादन आणि इतर संबंधित प्रक्रियांसाठी अत्याधुनिक यंत्रणा पुरवेल. हे मेगा सामायिक सुविधा केंद्र लहान उत्पादकांना सक्षम बनवेल, त्यांना कौशल्य प्रशिक्षण पुरवेल तसेच त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यात मदत करेल.

हा ८० कोटींचा प्रकल्प आहे, जो १ मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. इतर योजनांमध्ये दोन नवीन एसडीएफ (स्टँडर्ड डिझाइन फॅक्टरी) इमारतींचा समावेश आहे, जिथे सर्वात जुन्या एसडीएफ इमारतींच्या सदस्यांना १ आणि २ स्थलांतरित केले जाईल, असे ते म्हणाले. असल्याचे विकास आयुक्तांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ६९४ कंपन्यांसह या संपूर्ण क्षेत्राची एकूण निर्यात १,५४,३२८ कोटी रुपये होती.

जगन्नाथन म्हणाले की, सांस्कृतिक रजनी, नृत्य आणि नाटक, पुरस्कार सोहळे, रक्तदान शिबिरे, मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन, क्रिकेट स्पर्धा यासारख्या अनेक उपक्रमांद्वारे भारताच्या प्रमुख निर्यात प्रोत्साहन केंद्राचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. सिप्झचे सहविकास आयुक्त सीपीएस चौहान यांनी प्रमुख पैलू आणि कामगिरीबाबत थोडक्यात सादरीकरण केले. एमआयडीसीचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम नाईक आणि व्यापारी सदस्यही उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -