जम्मू (हिं.स.) : जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलांनी स्फोटकांनी भरलेले पाकिस्तानी ड्रोन उध्वस्त केले आहे. पाकिस्तानातून ऑपरेट होणाऱ्या या ड्रोनवर लागलेल्या स्फोटकांच्या माध्यमातून घातपात घडवण्याचे षडयंत्र आखण्यात आले होते. परंतु, सतर्क असलेल्या भारतीय सुरक्षा दलांनी हा डाव उधळून लावला.
यासंदर्भात माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तल्ली हरिया चाक भागात हा ड्रोन आकाशात घिरट्या घालत होता. हा ड्रोन सीमेपलिकडून भारतात दाखल होत होता. हा ड्रोन पाडल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने त्याची कसून तपासणी केली.
तपासणीनंतर या ड्रोनला ७ ‘अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर’ आणि ७ मॅग्नेटिक बॉम्ब लावले होते. ही सर्व स्फोटके जप्त करण्यात आली असून याचा पुढील तपास बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडकडून सुरु असल्याचे कठुआच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
सीमावर्ती भागात जिहादी दहशतवाद्यांकडून अशा छुप्या पद्धतीने कारस्थान सुरु असतात. यामध्ये आता ड्रोनसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापरही वाढला आहे. रिमोट तंत्रज्ञानाने ऑपरेट केल्या जाणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी सीमापार बसून भारतीय हद्दीत आपल्या कारवाया घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…