Monday, January 19, 2026

डिजिटल यूटीएस मोबाइल तिकीट प्रणालीला चांगला प्रतिसाद

मुंबई (वार्ताहर) : कोविडनंतर, मध्य रेल्वेवर प्रवासी डिजिटल यूटीएस मोबाइल तिकीट प्रणालीचा पर्याय निवडत आहे, जे नजीकच्या भविष्यात डिजिटल तिकीटिंचा वाटा वाढण्याची चिन्हे दर्शवित आहे. युटीएस मोबाईल ॲपद्वारे मुंबई उपनगरीय प्रवासाची तिकिटे/सीझन तिकिटांच्या खरेदीत सातत्याने वाढ होत आहे.

कोरोना विषाणूमुळे (कोविड-१९) लोक स्वत:च्या घरात बंदिस्त असताना गेल्या दोन वर्षांपासून जागतिक स्तरावर मोठा धक्का बसला आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट खिडकीवरील (बुकिंग ऑफिसमधील) गर्दी कमी करण्याची गरज यामुळे रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.

कोविड - १९ महामारीच्या काळात, उपनगरीय तिकिटे खरेदी करण्यासाठी युटीएस मोबाइल ॲप प्रवाशांसाठी पुन्हा उघडण्यात आले होते, तेव्हापासून युटीएस मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >