Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकटू (तिखट) रस

कटू (तिखट) रस

डॉ. लीना राजवाडे

कटू वदले मी रुसवा केला म्हणूनि जीवाचा जीवलग गेला” या गाण्यातून किंवा “कानामागून आली आणि तिखट झाली” अशा म्हणीतून आपल्याला ओळखीचा असणारा तिखट रस. आहारशास्त्राच्या दृष्टीने या कटू म्हणजे तिखट रसाविषयी जाणून घेऊयात आजच्या लेखात.

यो जिव्हाग्रं उद्वेजयति। कपोलयोःच अग्निज्वाला संस्पर्शादिव दुःखानुभवं करोति, मुख अक्षि नासिकां स्रावयति, सकलेच शरीरे विदाहं जनयति। अर्थात जो रस जि‍भेवर टाकल्या क्षणी जि‍भेच्या टोकावर भाजल्याप्रमाणे, गालाच्या आतील भागात आगीच्या ज्वालेच्या स्पर्शाप्रमाणे चटका जाणवतो, तोंड-डोळे-नाक यांची पण अंतःस्त्वचेतून स्राव पाझरू लागतात. संपूर्ण शरीरात दाह जाणवतो, असा हा तिखट रस होय.

वायू आणि अग्नी या महाभुतांचे प्राबल्य या रसात असते. ·तीक्ष्ण, उष्ण, लघू, रूक्ष विशद (स्वच्छ) गुणांनी हा रस शरीरात काम करतो. अग्नी महाभूत जास्त आहे, त्यामुळे उष्ण वीर्य किंवा शक्तीने हा रस काम करतो. ·शरीरातील पित्ताशी साधर्म्य असल्याने पित्त वाढवणारा आहे. मधुर रसाच्या विरोधी गुणाचा आहे. त्यामुळे कफ कमी करतो. उष्ण, तीक्ष्ण असल्याने कफामुळे येणारे गौरव, पैच्छिल्य कमी करतो. उष्ण वीर्य असल्याने वाताचे शमन करतो. रूक्ष गुणामुळे पुरीष मलाला घट्टपणा येतो, तर स्वेद क्लेद मूत्र कमी करणारा हा रस आहे. वक्त्रं शोधयति – वर जे वर्णन सांगितले, त्याप्रमाणे तोंडात टाकल्यावर जीभ आणि इतर अवयव स्वच्छ होतात. त्यामुळे जे अन्न खात आहोत, त्यातील रसांचे सम्यक ज्ञान होते.

अन्नं रोचयति – तोंड स्वच्छ होते. त्याचबरोबर लालास्राव आणि पाचक रस पाझरू लागतात त्यामुळे अन्न चविष्ट लागते.
दीपनः पाचनः – आमाशयातील कफ कमी करून आग्नेय गुण अधिक असल्याने भुकेची जाणीव होते. अन्न पचनही चांगले सुरू होते. प्रमाणात योग्य पद्धतीने तिखट रस अन्न पदार्थात वापरला आणि प्रमाणातच खाल्ला, तर पचनाच्या तक्रारी उद्भवत नाहीत. अति प्रमाणात तिखट रस खाल्ला, तर शरीराची ताकद कमी होते. सारखी तहान लागते. गळून गेल्यासारखे वाटते.

अत्युपयोगाद् पुंस्त्वं उपहन्ति। नंपुसकत्व येऊ शकते. याउलट प्रमाणात खाल्यास शरीराला उत्तम पोषण मिळते. ·कटू स्कंध-मसाल्यातील बरेच घटक जसे – हिंग, तमालपत्र, मिरे, सुंठ, मिरी, ओवा, विड्याचे पान, बडीशेप (या सर्व गोष्टी अन्नपदार्थ बनवताना वरून किंवा फोडणीत अगदी अल्प प्रमाणात, ऋतुनुसार, देशानुसार वापरात ठेवाव्यात. पारंपरिक पद्धतीत तसे व्यवहारात दिसते देखील.)

भाज्या – सुरण, कांदा, लसूण ·आधुनिक संशोधनातून सिद्ध झालेले काही निष्कर्ष -(2013 and 2017 research paper at NCBI)

Elephant foot yam – has low calorie soluble polysaccharide and dietary fibre. It’s cheap and economical source of vitamins, minerals and starch. It reduces cholesterol, normalizes triglycerides and improves blood sugar levels. Promotes intestinal activity and immune function. Black pepper-Its important healthy food owing to its antioxidant, antimicrobial and gastroprotective module. Piperine is an active ingredient in black pepper which has free radical scavenging activity and it might be helpful in chemopreventional controlling progression of tumour growth. This key alkaloid component assists in cognitive brain functioning and boost nutrient absorption and improve GI functionality.

आजची गुरुकिल्ली

कटुको रस : रोचयति अन्नम् तिखट रसाने अन्नाला चव येते.

पुढील लेखात जाणून घेऊ, कषाय किंवा तुरट रसाविषयी.

(leena_rajwade@yahoo.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -