Sunday, October 26, 2025
Happy Diwali

माथेरानमध्ये दोन दिवसांत १० हजार पर्यंटक

माथेरानमध्ये दोन दिवसांत १० हजार पर्यंटक

कर्जत (वार्ताहर) : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा पर्यटन हंगामा शेवटच्या टप्प्यात आला आहे. शनिवार, रविवारची सुट्टी आल्याने माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत माथेरानमध्ये तब्बल आठ ते दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक आल्याची माहिती आहे. दरम्यान, वाहतूककोंडीमुळे घाट रस्ता जाम झाला होता.

माथेरानमध्ये पर्यटक खासगी गाड्या घेऊन येणा-यांची संख्या जास्त आहे. मात्र पोलिसांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका पर्यटकांना बसतो आहे. वॉटर पाईप स्टेशनपुढे झालेल्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांची दमछाक झाली. त्यांना दोन किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक तासाचा कालावधी लागत होता. वाहतूक नियंत्रक पोलीस नसल्याने पर्यटकांच्या त्रासात अधिकच भर पङली आहे.

Comments
Add Comment