चिंताजनक! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव
May 28, 2022 06:33 PM 69
मुंबई : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोक वर काढले असून B.A.4 आणि B.A.5 या दोन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात शिरकाव केल्याने चिंतेत भर पडली आहे.
पुण्यात या दोन्ही व्हेरियंट्सचे मिळून एकूण सात रुग्ण आढळून आले आहेत. B.A.4 आणि B.A.5 या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे सध्या जगाला पुन्हा एकदा काळजीत टाकले आहे.