Thursday, July 18, 2024
Homeमहामुंबईवरळी किल्ल्याचा होणार कायापालट

वरळी किल्ल्याचा होणार कायापालट

मोकळ्या जागेत करणार आकर्षक झाडांची लागवड

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका क्षेत्राचा ऐतिहासिक ठेवा व सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि तब्बल ३४७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वरळी किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातील जिर्णोद्धार कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर व माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे व मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते.

‘जी दक्षिण’ विभागाद्वारे वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार व सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही काम केली जाणार आहेत. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील किल्ल्यांपैकी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये वरळी किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचे व सभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात आले आहे.

किल्ल्याच्या जिर्णोद्धारांतर्गत प्रामुख्याने स्थापत्य स्वरुपाची कामे करण्यात येणार असून तटबंदीची डागाडुजी देखील करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस व दक्षिणेकडील बाजूस समुद्र किनारी असलेल्या मोकळ्या जागेत समुद्रफुल अशा आकर्षक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच किल्ल्याबाहेरील मोकळ्या जागेत हिरवळ व इतर शोभेची झाडे लावून बेसॉल्ट दगडाच्या पायवाटा देखील तयार करण्यात येणार आहेत. वरळी किल्ल्याची महती आणि माहिती सांगणारे फलक, दिशादर्शक फलक इत्यादी देखील परिसरात जागोजागी बसविण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -