१७ गावांवर पुन्हा पाण्याचे संकट...

पाच दिवस काम चालू राहणार असल्याने गावांचा पाणीपुरवठा बं


सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील केळवे रोड पूर्व भागात असलेल्या झांझरोळी धरणाअंतर्गत असणाऱ्या १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले असल्यामुळे सतरा गावांचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांना पुन्हा पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.


याआधीही धरण दुरुस्तीच्या दरम्यान काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ओढवली. झांझरोळी धरणातून १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा गाळ गेल्या अनेक वर्षांपासून काढला नव्हता. त्यामुळे या विहिरीत सुमारे पंधरा ते वीस फूट गाळ जमा झाला असून विहिरीत जमलेला गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा गाळ सोमवारपर्यंत काढण्यात येणार असल्याने ऐन उन्हाळ्यात सतरा गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पाण्याची भूजल पातळी खाली गेल्याने अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही गावे, पाडे खाडीकिनारी असल्याने बोअरवेल किंवा विहिरींना खारे पाणी लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी झाझंरोळी धरणावरच अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. गेले अनेक दिवस पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे सामाजिक संस्थेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.


झांझरोळी धरणाचे दोन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने १७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. झांझरोळी धरणातून पश्चिमेकडील माहीम, केळवे, दातिवरे, माकुणसार, आगरवाडी, एडवण, विळंगी, कोरे, भादवे, मधुकरनगर आदी १७ गावांना आता पुन्हा पाणीपुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.


गुरुवारी विद्युत बिल न भरल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने तुर्तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र वीज जोडणी सुरू केली असली तरी मुख्य विहीर साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याने हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा शाखा अभियंता प्रशांत इंगळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या काळातच कंत्राटदारांना ९०० कोटींची वर्क ऑर्डर

घनकचऱ्याच्या कंत्राटाची सर्वत्र चर्चा विरार : विविध कारणास्तव वादग्रस्त आणि सतत चर्चेत राहिलेल्या

वाडा-भिवंडी-मनोर महामार्गाची दुरवस्था

ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खिळखिळे, प्रशासन सुस्त वाडा : वाडा-भिवंडी-मनोर या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या

डहाणू नगर परिषदेत पुन्हा एकदा भरत ‘राज’

भाजप जिल्हाध्यक्ष राजपूत यांची स्वीकृत आणि स्थायी समिती सदस्यपदी निवड गणेश पाटील पालघर : डहाणू नगर परिषदेच्या

पालघरमधील विविध प्रकल्पांविरुद्ध संघटनांचा आक्रोश मोर्चा

‘कष्टकरी’, माकपसह अनेक संघटना सहभागी पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाढवण बंदर, चौथी मुंबई आणि

एससी, एसटी, ओबीसी आरक्षण ‘राजयोग’ आणणार

बविआकडे अनु. जमातीचे पाच, मागासवर्गीय तीन नगरसेवक गणेश पाटील,विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा